Latest news

Thursday, 15 August 2013

तुटणारी कुटुंबे वाचवा...

तुटणारी कुटुंबे वाचवा...

कौटुंबिक हिंसाचारासारख्या एकतर्फी कायद्यामुळे अनेक कुटुंबे तुटत आहेत. हे कायदे बदलण्यासाठी एनजीओंसह नागरिकांनीही पुढे यावे, असे आवाहन करीत केरळमधील चार युवक सायकलने भारतभ्रमणासाठी निघाले. सोमवारी ते नागपुरात दाखल झाले. 'सेव्ह इंडियन फॅमिली'सह 'सेव्ह एनर्जी', 'स्टे हेल्दी' असाही नारा ते देत आहेत.

पुरुषावकासा समरक्षणा समितीचे हे युवक आहेत. केरळातील त्रिचूर येथून २८ जुलै रोजी ते सायकलने निघाले. उत्तर भारतमार्गे ते जम्मू-काश्मिरात लद्दाखमध्ये पोहचतील. ५५ दिवसांचा त्यांचा हा प्रवास आहे. सोमवारी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. या रॅलीत पी. आर. गोकुल हे सेव्ह इंडियन फॅमिली, सी. डी. फ्रान्सिस सेव्ह एनर्जी तर लिओ जोसेफ व शर्पिन पी. टी. स्टे हेल्दी असा नारा देत आहेत.

कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीचा ४९८ (अ) हे कायदे फक्त महिलांच्या बाजूने आहेत. त्यांचा अनेकदा गैरवापर होताना दिसतो. त्यात पती व त्याच्या कुटुंबीयांना त्रास सोसावा लागतो. या कायद्यात बदल करावेत, अशी मागणी या रॅलीतून करण्यात येणार आहे. तसेच, इतर एनजीओंनीही त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येणार आहे. 


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/21809516.cms?prtpage=1 

No comments:

Post a Comment