Latest news

Friday 30 August 2013

Government encouraging Male employees to have girl friend

आता शासकीय अधिकाऱ्यांच्या विवाहबाह्य प्रेयसींनाही पेन्शन

आता शासकीय अधिकाऱ्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या पत्नीसोबत त्याच्या प्रेमिकेलाही पेन्शन मिळणार आहे. अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर प्रेमिकेने हक्क सांगितला तर तिला पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय शासकीय अधिकाऱ्याच्या घटस्फोटित पत्नीला आणि तिच्या मुलांनाही पेन्शनमध्ये वाटा मिळणार आहे. आयएएस, आयपीएस, फॉरेस्ट सर्व्हिसमधील अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचं पेन्शन सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार अधिकाऱ्याचे अनैतिक संबंध असलेल्या प्रेयसीलाही पेन्शन मिळेल. नव्या नियमानुसार 'ऑल इंडिया सर्व्हिस'च्या अधिकाऱ्यांना २० टक्के अतिरिक्त पेन्शन मिळणार आहे. वयाची ८५ वर्षं पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना ३० %, ९० वर्षं पूर्ण करणाऱ्यांना ४०%, ९५ वर्षं पूर्ण करणाऱ्यांना ५०% आणि १०० वर्षं पूर्ण करणाऱ्यांना १००% पेन्शन मिळेल.

पती आणि पत्नी दोघंही शासकीय सेवेत असल्यास निवृत्त सेवेनंतर किंवा मृत्यूनंतर मिळणारी पेन्शन ही दुसऱ्या एकाच्या नावे होईल. तसंच पती आणि पत्नी या दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांचे मुले पेन्शनसाठी पात्र ठरतील असे, या नियमात सांगण्यात आले आहे.

http://zeenews.india.com/marathi/news/india/new-laws-of-pension-for-ais-officers/162668 

No comments:

Post a Comment